Thu, Sep 21, 2017 23:21होमपेज › Kolhapur › जाणून घ्या कोल्हापुरात काल झालेल्या पावसाच्या महत्वपूर्ण गोष्टी 

कोल्हापूर शहर परिसरात धगफुटीसदृश पाऊस (पाहा फोटो)

Published On: Sep 14 2017 5:22AM | Last Updated: Sep 14 2017 12:21PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

* राजोपाध्येनगर मध्ये नागरिक संतप्त, बांधकाम व्यावसायिकाचे ऑफीस फोडले. वाहत्या ओढ्यावर अतिक्रमण केल्याने पाणी घरात शिरल्याचा नागरिकांचा आरोप. पाणी जाण्यासाठी घरांच्या भिंती फोडल्या.

मुसळधार पावसाने कार गेली वाहून

* रायगड कॉलनी आणि जरग नगरला जोडणाऱ्या पुलावरील रस्ता कालच्या पावसामुळे खचला. त्यामध्ये एक चारचाकी गाडी वाहून गेली. पण सुदैवाने गाडी झाडाला जाऊन अडकली तर एक दुचाकी ओढ्यातून वाहून गेल्याची माहीती आहे.  या परिसरातील बऱ्याच घरात पाणी शिरले.

* मोरेवाडी, शिवाजी विद्यापीठ, अॅस्टर आधार हॅास्पिटल शास्त्री नगर येथे ओढ्यात 1 रिक्षा, 2 बुलेट, 1 स्प्लेडर, 1 बोलोरो वाहून गेली

कोल्हापूर शहरासह परिसराला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. बुधवारी रात्री ११ वाजल्यापासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. विजांचा धडकी भरवणाऱ्या आवाजाने अनेकांची झोप उडाली.

मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी घरात व दुकानातही पाणी शिरले. तसेच शहरातील काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. या पावसानंतर शहरातील रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी पहायला मिळत होते.


1. कोल्हापूर शहर आणि परिसरात बुधवारी रात्री धगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे तीन तास पावसाने अक्षरशः थैमान घातले.
2. शास्त्री नगर, वाय.पी.पोवार नगर,आर.के.नगर परिसरात चारचाकी व दुचाकी वाहने,कचरा कोंडळ्याचे लोखंडी कंटेनर वाहून गेले.
3. पावसाने वर्षा नगर, रामानंद नगर, देवकर पाणंद,साळोखे पार्क,शास्त्री नगर, राजोपाध्ये नगर आदिसह अनेक भागात पाणी शिरले.
4. सुमारे 300 हून अधिक घरात पाणी शिरल्याने    नागरीकांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी घराबाहेर,दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य, वस्तू वाहून गेल्या.
5. पावसाने पंचगंगेच्या पातळीत 6 फुटांनी वाढ झाली.
6. यावर्षी चौथ्यांदा राजाराम बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला. सकाळी ८.०० वा. राजाराम बंधार्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर 
7. कळंबा तलाव 26 फूट भरला असून ओव्हरफ्लो होण्यास 1 फूट पाणी कमी आहे. 
8. रंकाळा तलावही पूर्ण भरला आहे.