Tue, Jan 22, 2019 22:33होमपेज › Kolhapur › अचानक वळीव पावसाने शेतकऱ्यांची ताराबंळ 

अचानक वळीव पावसाने शेतकऱ्यांची ताराबंळ 

Published On: Apr 06 2018 1:38AM | Last Updated: Apr 05 2018 6:05PMम्हाकवे : वार्ताहर

म्हाकवे परिसरात  आज सायंकाळी  अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गाची ताराबंळ उडाली. जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी घरावरील कौले, पञे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकर्‍यांनी ठेवलेली वाळलेली वैरण भिजून नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कडबा भिजून वैरणीचे नुकसान झाले.

पाऊस आणि जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी आंबा फळाचे नुकसान झाले आहे. वळीव पावसाने वीटभट्टी धारकांनाही फटका बसला आहे. वळीव पाऊस ऊस पिकाला फायदेशीर ठरला आहे. वळवाचा अधिक फटका वैरीणीला बसला आहे.