Wed, Apr 24, 2019 02:08होमपेज › Kolhapur › दांडीबहाद्दरांना दणका

दांडीबहाद्दरांना दणका

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 22 2018 11:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी

आरोग्य निरीक्षक अमर कांबळे याने झाडू कामगार प्रियांका कांबळे रजेवर असताना त्यांची हजेरी भरून त्याबदल्यात अर्धा पगार घेतला आहे. याबाबत आयुक्‍तांपर्यंत तक्रार गेली होती. त्या आरोग्य निरीक्षकावर काय कारवाई केली? अशी विचारणा स्थायी सभेत सदस्यांनी केली. तसेच कर्मचारी नगरसेवकांना उर्मट बोलतात. अधिकारी भागात फिरत नाहीत, अशा तक्रारीही करण्यात आल्या. त्यावर प्रशासनाच्या वतीने संबंधित कर्मचार्‍यास नोटीस दिली आहे.

अहवाल आयुक्‍तांना सादर केला आहे. आरोग्य निरीक्षक कांबळे यास कमी करण्याबाबतचे आयुक्‍तांचे आदेश आहेत. त्याबरोबर गेल्या वर्षभरात गैरहजर 126 कर्मचार्‍यांच्या कायमस्वरूपी वेतनवाढी थोपवल्या आहेत. 46 कर्मचार्‍यांची चौकशी सुरू आहे. 22 कर्मचारी दोषी आहेत. 7 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यासाठी व इतर कर्मचारी मूळ पदावर घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.  सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सत्यजित कदम, कविता माने, प्रतिज्ञा निल्ले, संदीप नेजदार, राहुल माने, संजय मोहिते, सविता घोरपडे, गिता गुरव आदींनी चर्चेत भाग घेतला.   

खरमातीमुळे नाले तुंबू लागले...

सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये वायरिंग लोबकळत आहे, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने वायरिंग बदलण्यासाठी टेंडर काढले आहे, असे स्पष्ट करण्यात आले. नालेसफाई कधी सुरु करणार. नाल्याभोवती भर टाकल्याने नाल्यात खरमाती जावून नाले तुंबतात, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने नाल्याच्या परिसरात टाकलेल्या भरावाचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु आहे. गाळ काढण्याचे प्रभागनिहाय नियोजन केले आहे. कामगार चाळीत राहणार्‍या कर्मचार्‍यांचे भाडे पगारातून कपात होत नाही.17 ते 18 वर्ष कर्मचारी तसेच राहत आहेत, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने शहरात मनपाच्या 9 चाळी आहेत. डाटा संकलन केला आहे. काही कर्मचारी निवृत्त झालेत परंतु वारसदार राहतात. त्याचा प्रस्ताव सादर केला आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 
वळवाच्या पावसात रस्ता वाहून गेला... 

जनता बाझार ते लॉ कॉलेज रस्ता वळवाच्या एकाच पावसात पुन्हा वाहून गेला. वॉरंटीची मुदत संपण्यापुर्वी रस्ता पुन्हा करुन घ्या. संपुर्ण शहरात अशीच परिस्थिती आहे. नगरसेवकांनी तक्रार केल्यावरच अधिकारी ठेकेदारावर कारवाई करतो म्हणून सांगतात. मग संबधीत भागातील कनिष्ठ अभियंता, मुकादम करतात काय? पाहणी करुन वरिष्ठांना रिपोर्ट का सादर करीत नाहीत? अशी विचारणा सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाच्यातीने 3 मार्च रोजी परिपत्रक काढले आहे. सर्व विभागीय कार्यालयांना अहवाल दयायला सांगितले आहे. गेल्यावेळी 27 रस्ते पुन्हा करुन घेतलेले आहेत. 20 एप्रिल पर्यंत अशा रस्तांची कामे पुर्ण् करुन घेवू, असे स्पष्ट करण्यात आले.

Tags : Kolhapur, Kolhapue News ,health department, employee absentee fraud Kolhapur Munciple Corporation