होमपेज › Kolhapur › अपघातात पत्नी ठार; पती जखमी

अपघातात पत्नी ठार; पती जखमी

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:20AM

बुकमार्क करा

हातकणंगले : प्रतिनिधी

आळते (ता. हातकणंगले) येथील श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना दुचाकींची धडक होऊन सौ. विमल प्रकाश शिंदे (वय 48, रा. गौरीशंकरनगर, तारदाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, त्यांचे पती प्रकाश महादेव शिंदे जखमी आहेत.

इचलकरंजी फाट्यावर रविवारी सकाळी हा अपघात झाला. प्रकाश शिंदे यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात वर्दी दिली. विमल या पती प्रकाश यांच्यासमवेत मोटारसायकलवरून (एम एच 09 एई 7295) आळते येथे श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

दर्शन घेऊन गावी परत जात असताना हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्यावर मागून येणार्‍या भरधाव मोटारसायकलने (एम एच 09 सीई 8618) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये विमल रस्त्यावर जोरात पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश किरकोळ जखमी झाले. येथील ग्रामीण रुग्णालयातील उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.