होमपेज › Kolhapur › हातकणंगलेत घरफोडी;  63 हजारांचा मुद्देमाल लंपास

हातकणंगलेत घरफोडी;  63 हजारांचा मुद्देमाल लंपास

Published On: Dec 30 2017 1:53AM | Last Updated: Dec 30 2017 1:50AM

बुकमार्क करा
हातकणंगले : प्रतिनिधी

येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील दिलीप बंडू मेंगणे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरीतील 63 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. चोरट्याने सोन्याचा गोप, चेन, रिंगा, झुबे व टायटन घड्याळही चोरून नेले आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.  दरम्यान, कोल्हापुरातून श्‍वानपथकाचा पाचारण करण्यात आले होते. पण रेल्वे स्टेशनपर्यंत श्‍वानाने माग दाखवला व तिथेच घुटमळले. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.