Sun, Oct 20, 2019 02:20होमपेज › Kolhapur › रूकडीत चुलत सासू, जावेने पेटविलेल्या विवाहितेचा मृत्यू

रूकडीत चुलत सासू, जावेने पेटविलेल्या विवाहितेचा मृत्यू

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:14AM

बुकमार्क करा

हातकणंगले : प्रतिनिधी

रूकडी येथील भाजून जखमी झालेल्या सुरेखा विजय कोळी (37) यांचा सीपीआरमध्ये  उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.  मोकळ्या जागेवरून वाद झाल्याने त्यांना पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न चुलत सासू व चुलत जावेने केला होता. याप्रकरणी संशयित चुलत जाऊ प्रतिभा धनंजय कोळी व चुलत सासू कमल बाळासो कोळी यांच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे.  

सुरेखा कोळी व संशयितांची बिरोबा मंदिरासमोर जागा आहे. या जागेबाबत कोळी कुटुंबामध्ये गेली 15 वर्षे वाद आहे. याच कारणातून त्यांच्यात शुक्रवारी रात्री 8 वाजता दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी संशयित प्रतिभा हिने सुरेखाच्या अंगावर रॉकेल ओतले, तर कमल हिने काडी टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये सुरेखा या 40 टक्के भाजल्या. त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. सुरेखा यांनी तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.