Mon, Nov 19, 2018 06:34होमपेज › Kolhapur › क्षारपड शेती सुधारण्यासाठी जिल्हा बँक कर्जपुरवठा करणार 

क्षारपड शेती सुधारण्यासाठी जिल्हा बँक कर्जपुरवठा करणार 

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 11:44PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपली बँक आहे. ती टिकली पाहिजे या हेतूने शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी या बँकेत ठेवी ठेवून बँकेचे हित जोपासले आहे. ठेवी ठेवण्याच्या बाबतीत शिरोळ तालुका अव्वल आहे. म्हणून या तालुक्यातील शेतकर्‍यांचा उत्कर्षासाठी क्षारपड शेती सुधारणेसाठी एप्रिल महिन्यापासून 11 टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करणार असल्याची ग्वाही केडीसी बँकेचे चेअरमन आ.हसन मुश्रीफ यांनी दिली.

केडीसी बँकेच्या कुरूंदवाड शाखेतील एटीएम सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमातते बोलत होते.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. बँकेच्या संचालिका माजी खा. निवेदिता माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष किरणसिंह जोंग, पंचायत समितीच्या सभापती सौ. मिनाक्षी कुरडे उपस्थित होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, 2007 साली कर्जमाफीतील शेतकर्‍यांना नाबार्डने 4 वर्षांनंतर अपात्र ठरवत 112 कोटी रुपये वसूल केले. या प्रक्रियेत अनेक संस्था, सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिग्गज वकिलांची फौज पाठवली असून लवकरच ही रक्‍कम नाबार्डकडून व्याजासह वसूल करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कुरूंदवाड शाखेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या संस्था, सोसायट्यांना मान्यवरांच्या हस्ते ठेवीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. श्रीमती माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत, प्रास्ताविक कुरूंदवाड शाखेचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी केले.

यावेळी जयसिंगपूरचे नगरसेवक संजय पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अमरसिंह माने, प्रकाश पाटील-टाकवडेकर, अरुण आलासे, प्रदीप पाटील, जिनगोंडा पाटील आदी उपस्थित होते. आभार शिवाजी कानडे यांनी मानले.