Wed, Jul 24, 2019 12:32होमपेज › Kolhapur › हाळोली, देवर्डेत हत्तीकडून उसाची नासाडी; मोटारपंप पेटीची मोडतोड

हाळोली, देवर्डेत हत्तीकडून उसाची नासाडी; मोटारपंप पेटीची मोडतोड

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:59PM

बुकमार्क करा
आजरा : वार्ताहर

आजरा तालुक्यातील हाळोली व देवर्डे परिसरात हत्तीने हैदोस घातला असून, ऊस पिकाच्या नुकसानीसह मोटारपंपाच्या विजेच्या पेटीची मोडतोड करून दहशत माजवली आहे. हत्तीच्या या दहशतीने तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी धास्तावला असून भीतीच्या छायेखाली आहेत.

आजरा तालुक्याच्या पश्‍चिम भागात हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. हत्तीकडून ऊस, केळी, मेसकाठी, काजूची झाडे, नारळ आदींची नासाडी केली जात असून शेती अवजारांचेही मोठ्या प्रमाणात हत्तीकडून मोडतोड होत आहे. चार दिवसांपूर्वी वेळवट्टी येथे हत्तीने देसाई यांच्या शेतातील ट्रॅक्टरचा हूड तोडून दूरवर फेकून दिला होता. काल रात्री हत्तीने हाळोली येथील लक्ष्मण तानाजी दारूटे यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान करत देवर्डे येथील तानाजी तानवडे यांच्या शेतातील मोटारपंपाच्या विजेच्या पेटीची मोडतोड केली. तसेच जवळच असलेल्या उसाचीही नासाडी केली. 

शुक्रवारी पहाटे हत्ती देवर्डेहून हाळोली परिसराकडे गेला असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनरक्षक एस. एस. इंगळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा केला असून त्यांनी परिसरातील नागरिकांना सावधानतेचे आवाहन केले आहे.