Fri, Nov 16, 2018 00:24होमपेज › Kolhapur › पानसरेंच्या हत्येचा तावडेच ‘मास्टरमाईंड’; वकिलांचा युक्तिवाद(video)

पानसरेंच्या हत्येचा तावडेच ‘मास्टरमाईंड’; वकिलांचा युक्तिवाद (video)

Published On: Jan 20 2018 5:03PM | Last Updated: Jan 20 2018 5:19PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या कटात ‘सनातन’चा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच ‘मास्टरमाईंड’ असल्याचे भक्कम पुरावे ‘एसआयटी’च्या चौकशीतून पुढे आले आहेत, असा जोरदार युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी शनिवारी न्यायालयात केला. सारंग आकोळकर, विनय पवारच्या मदतीने पुरोगामी नेत्यांच्या हत्येसाठी त्याने षडयंत्र रचल्याचे उघड झाल्याने या ‘मास्टरमाईंड’चा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशीही त्यांनी न्यायालयात मागणी केली.

कॉ. पानसरे हत्येतील आरोपी डॉ. तावडे यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधिश (2) एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरोपी तावडे याचे वकिल समीर पटवर्धन, अ‍ॅड वीरेंद्र इचंलकरंजीकर यांनी उर्वरित युक्तीवाद पुर्ण केल्यानंतर विशेष सरकारी वकिल निंबाळकर यांनी डॉ.तावडे यांच्या जामिनाला जोरदार हरकत घेतली. अडीच तासाच्या युक्तीवादानंतर न्यायाधिश बिले यांनी डॉ.तावडे याच्या जामिनावर 30 जानेवारीला निर्णय होईल, असे जाहीर केले.