Mon, Mar 25, 2019 09:11होमपेज › Kolhapur › दोन संशयित कोण?

दोन संशयित कोण?

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 25 2018 1:26AM कोल्हापूर : प्रतिनिधी

अंधश्रध्दा निमुर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्येसह नालासोपारा स्फोटक साहित्य साठा प्रकरणी तासगाव तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले दोन संशयित कोण?याची शुक्रवारी दिवसभर कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात जोरात चर्चा रंगली होती. एसआयटी वरिष्ठसुत्रांनी मात्र तोंडावर बोट ठेवले आहे. एटीएसने नालासोपारा येथील स्फोटक पदार्थासह गावठी बॉम्बसाठा हस्तगत केल्यानंतर संशयिताच्या चौकशीत पुरोगामी नेत्याच्या हत्येच्या पार्श्‍वभुमीवर धक्कादायक माहिती उघड होत आहे.त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी चौकशीची यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे.  स्फोटकपदार्थासह भावठी बॉम्बसाठाप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरचे कोल्हापूरसह परिसरात चार वर्षे वास्तव्य होते. विश्‍वासू मित्र वैभव राऊत कळसकरला भेटण्यासाठी वारंवार कोल्हापूरला येत होता. हे दोघेजण कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही भटकत होते. विविध संघटनांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना वारंवार भेट होते.त्याचअनुषंगाने तासगाव,जतसह खानापूर,आटपाडी तालुक्यातील काही मित्रांच्या संपर्कात सातत्याने होते.अशीही माहिती एटीएसच्या चौकशीतून निष्पन्न झाल्याचे वरिष्ठसुत्राकडून समजते. 

भरत कुरणेने केली गौरी यांच्या खुन्यांना पलायनासाठी मदत

बेळगाव : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या बेळगावातील भरत कुरणेने मारेकर्‍यांना  लंकेश यांच्या हत्येनंतर खुन्यांना बंगळूरहून हुबळीला पळून जाण्यास मदत केली. तशी कबुली त्याने एसआयटी अधिकार्‍यांकडे दिल्याची माहिती मिळाली आहे.आतापर्यंत झालेल्या एसआयटी चौकशीतून परशुराम वाघमारे याने गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर मोटारसायकलवर असणारा संशयित हा गणेश मिस्कीन आहे. या दोघांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर बंगळुरातून त्यांना पळून जाण्यात कुरणेने मदत करताना नेलमंगल टोल नाक्याजवळ या दोघांना कुरणेने बसमध्ये बसविले. या हत्येतील मास्टरमाईंड म्हणून ओळखला जाणारा अमोल काळे (पुणे) याने या हत्येसाठी भरत कुरणेकडे मदत मागितली होती. त्यानुसार तो बंगळुरात येऊन कुंबलगोडी येथील एका फ्लॅटमध्ये स्वयंपाक बनवून संशयितांच्या जेवणाची व्यवस्था करत होता. त्याआधी त्याने बेळगावनजीकच्या चिखले (ता. खानापूर) येथे आपल्या शेतामध्ये पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास होकार दर्शविला होता.