Wed, Jan 23, 2019 04:41होमपेज › Kolhapur › कमी दराच्या आर.सी. लपवून डल्ला

कमी दराच्या आर.सी. लपवून डल्ला

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:11AMकोल्हापूर : नसिम सनदी 

जिल्हा परिषदेत झालेला औषध खरेदी घोटाळा तांत्रिक असल्याचे आता समोर येत आहे. खरेदी आर.सी. अर्थात शासन दरपत्रकाप्रमाणेच झाली आहे; पण कमी दराच्या आर.सी. लपवून जादा दराची एकमेव आर.सी. मंजूर कशी होईल, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. यात लेखाधिकार्‍यांचे पूर्ण कौशल्य पणाला लावण्यात आल्याचे आता उघड होत आहे. यात संगनमताने डल्ला मारला गेल्याचे आता स्पष्ट होत आहे. 

औषध खरेदीत अनावश्यक आणि जादा दराने खरेदी झाल्याचे चौकशीत उघड झाल्याने हा घोटाळा नेमका कुणी व कसा केला, याबाबतीत चर्चा सुरू आहे. आरोग्य विभाग व वित्त विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. बिल मंजुरीचे काम आपले नाही, असे सांगत आरोग्य विभाग हात झटकत आहे. वित्त विभागानेही बिल जरी आम्ही मंजूर करत असलो, तरी आरोग्य विभागाने आर.सी.प्रमाणे टिप्पणी तयार केली असल्याचे म्हटले आहे. ही टिप्पणी ठेवताना नियमाप्रमाणे 4 आर.सी. ठेवणे बंधनकारक असतानाही एकच आर.सी. अंतिम मंजुरीसाठी राहील, अशी टिप्पणी आरोग्य अधिकार्‍यांनी ठेवली. बाकीच्या आर.सी. दाखवल्याच नाहीत. टिप्पणीवर दोन ते चार क्रमांकावरची आर.सी. शून्यच दिसत आहे. आपल्याला अंधारात ठेवूनच हा कारभार केल्याचे वित्त विभागाच्या सूत्रांनी सांगितले.