Thu, May 23, 2019 15:25
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › जात वैधता प्रमाणपत्रप्रकरणी सरकार सकारात्‍मक : चंद्रकांत पाटील

जात वैधता प्रमाणपत्रप्रकरणी सरकार सकारात्‍मक : चंद्रकांत पाटील

Published On: Aug 27 2018 2:21PM | Last Updated: Aug 27 2018 2:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जात वैधता प्रमाणपत्राअभावी निर्माण झालेला प्रश्न  सोडवण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली.

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीबाबत शिवाजी विद्यापीठात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, या बैठकी दरम्यानच मला मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आला. यातील चर्चेत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांचा प्रश्न असल्याचे सांगितले.

हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, कायदेशीर गुंता आहे. त्याबाबत कायदा सचिवांसोबत चर्चा करून काय मार्ग निघतो? याची माहिती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे चंद्रकांत पाटील म्‍हणाले.