Wed, Feb 20, 2019 20:53होमपेज › Kolhapur › गव्याच्या धडकेत इब्राहिमपूरच्या युवकाचा मृत्यू 

गव्याच्या धडकेत इब्राहिमपूरच्या युवकाचा मृत्यू 

Published On: May 02 2018 11:19PM | Last Updated: May 02 2018 11:13PMचंदगड : प्रतिनिधी
बुझवडे धनगरवाडा (ता. चंदगड) येथील व सध्या राहणार इब्राहिमपूर पैकी धनगरवाडा येथील नानाजी बाबू वरक (वय ४०) यांना जंगली गव्याने जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. 

वरक दि. ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजता आपल्या दुचाकीवरून बुझवडे ते इबहिमपूर या रस्त्याने जात असताना गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या छातीला मार लागून ते जागीच ठार झाले. वनपाल ज्ञानेश्वर राक्षे यांनी त्यांच्या कुटुंबियांना ८ लाखाची मदत शासनाकडून मिळवून देऊ असे आश्वासन दिले. वनपाल डी. एच. पाटील, व्ही. एच. पाटील, आर. वाय. पाटील, सी. पी. पाऊस्कर, विजय गोसावी यांनी घटनेचा पंचनामा केला. वरक याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.