Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Kolhapur › पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्याला मारहाण, क्‍लिप व्हायरल (Video)

पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्याला मारहाण, क्‍लिप व्हायरल (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गारगोटी : (कोल्‍हापूर) : प्रतिनिधी

गारगोटी येथील आयसीआरई पॉलिटेक्‍निक विद्यालयातील एका विद्यार्थ्यास किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या मारहाणीची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. 

चांदेवाडी (ता.आजरा) येथील विद्यार्थी संग्राम जयसिंग कोंडूस्कर हा गारगोटीतील आयसीआरई पॉलिटेक्‍निक विद्यालयात सिव्हीलच्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचे सबमिशन ॠषीकेश राजिगरे, नमित सुर्यवंशी व नितीन सुतार यांनी काढून घेवून वेळेत परत केले नाही. त्यामुळे संग्राम याने या तीघांना याबाबत विचारणा केली असता, याचा राग मनात धरून संग्राम रहात असलेल्या ठिकाणी जाऊन या तीघांनी संग्रामला पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्‍याच्या पायावर दारूची बाटली मारली. त्यामुळे संग्राम याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रणही उटले आहेत. तसेच या मारहाणीच्या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून सर्वत्र व्हायरल केली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विश्‍वात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची गंभीर दख्रल  आयसीआरई पॉलिटेक्नीक विद्यालयाने घेतली असून मारहाण करणार्‍या त्या तिघांवर कारवाई केल्याचे समजते 

Tags : gargoti, fierce assault,retail grounds, student,ICRE, polytechnic, high school,


  •