Fri, Jul 19, 2019 17:49होमपेज › Kolhapur › गगनगडावर आज प.पू. गगनगिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा 

गगनगडावर आज प.पू. गगनगिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा 

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:43PM

बुकमार्क करा
गगनबावडा : प्रतिनिधी

विश्‍वगौरव सन्मानित प. पू. गगनगिरी महाराज यांचा 10 वा पुण्यतिथी सोहळा गगनगडावर आज शनिवारी (दि. 13) होत आहे. यानिमित्त गगनगडावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून पहाटे अभ्यंगस्नान,काकड आरती, सप्तशती वाचन , गगनबावडा गावातून सवाद्य  ग्रामप्रदक्षिणा लघु रुद्र, महाप्रसाद, संगीत भजन , नामस्मरण आरती आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटथर (ता. देवगड) येथील पायी दिंडीसह अनेक ठिकाणाहून दिंड्या गगनगडावर दाखल झाल्या आहेत. प.पू. गगनगिरी महाराज विश्‍वस्त ट्रस्ट गगनबावडा यांचेवतीने या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गगनगिरी आश्रमाचे ट्रस्टी रमेशराव माने व बापूसाहेब पाटणकर यानी केले आहे. सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक गगनगडावर हजेरी लावतात.