Sun, Apr 21, 2019 14:06होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजला गिरणी कामगारांचा मोर्चा

गडहिंग्लजला गिरणी कामगारांचा मोर्चा

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 11:38PM

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

आपल्या विविध मागण्यांसाठी गिरणी कामगारांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. मोर्चाची सुरुवात लक्ष्मी मंदिरापासून झाल्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.  यावेळी दिलेल्या निवेदनात, गिरण्या बंद झाल्याने कामगार देशोधडीला लागले आहेत. या गिरणींच्या जागांवर आलिशान प्रकल्प उभारले गेले. मात्र, गिरणी कामगारांकडे दुर्लक्षच झाले. आजपर्यंत केवळ  12 हजार गिरणी कामगारांना घरांचे वाटप केले आहे. अद्याप 

1 लाख 63 हजार कामगारांना घरे देणे बाकी आहे. गिरणी कामगारांना तातडीने घरे देण्यासाठी सध्याचे सरकारही चालढकल करत असून, यासाठी आता पुन्हा आंदोलने करावी लागत आहेत. गिरणी कामगार व वारसदारांना कधी व कोठे घरे देणार, याबाबत कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर करावा. गिरणी कामगारांच्या अर्जांची छाननी करून गिरणी कामगारांना घरपात्र कार्ड मिळावे. जमीन विकून, विकसित करून हजारो कोटी रुपये कमवणार्‍या गिरणीमालक व विकसकांकडून गिरणी कामगारांच्या घर बांधणीचा खर्च वसूल करण्याचे धोरण सरकारने वापरावे. निवेदनावर कॉ. अतुल दिघे, कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. रामजी देसाई, कॉ. शांताराम पाटील,  धोंडिबा कुंभार यांच्या सह्या आहेत.