Mon, May 27, 2019 09:32होमपेज › Kolhapur › रक्‍ताळलेले कपडे नदीत फेकले

रक्‍ताळलेले कपडे नदीत फेकले

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:21AM

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील माध्यमिक शिक्षक विजयकुमार गुरव यांचा त्यांच्याच घरातील बेडरूममध्ये खून करून मृतदेह आंबोली येथील दरीमध्ये टाकल्यानंतर बेपत्ता झाल्याची वर्दी नोंद करण्यात आली होती. सोमवारी सुरेश चोथे याला पुन्हा गडहिंग्लजमध्ये आणण्यात आले असून, त्याने खुनानंतर रक्‍ताने माखलेले कपडे हिरण्यकेशी नदीमध्ये टाकल्याचे सांगितले होते. यामुळे पोलिसांनी त्याला हिरण्यकेशी नदी परिसरामध्ये आणून ज्या ठिकाणी कपडे टाकले तेथे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे कपडे मिळू शकले नाहीत.

यापूर्वीच या दोन्ही आरोपींनी आपण घरामध्येच रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असताना गुरव यांचा खून केल्याचे कबूल केले असून, प्रथम गळा दाबून, मग त्यांच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट केले आहे. पोलिसांना  बेडरूममधून रक्‍ताचे डाग मिळाले असून, आरोपी चोथे याने गुरव यांचा खून करण्यापूर्वी आपण आंबोली येथे दोन ते तीनदा गेल्याचे सांगून जागेची पाहणी करूनच खून केल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे हा खून थंड डोक्यानेच केला असून, या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.