Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Kolhapur › ‘पुढारी’कार ग. गो. जाधव स्मृतिदिनानिमित्त डॉ. काकोडकर यांचे आज व्याख्यान

‘पुढारी’कार ग. गो. जाधव स्मृतिदिनानिमित्त डॉ. काकोडकर यांचे आज व्याख्यान

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै.‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. 20) जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित केलेे आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत शाहू स्मारक भवन येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे राहणार आहेत.

‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, विचारवंत, अभ्यासक आदींनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत. रविवारी डॉ. काकोडकर ‘शाश्‍वत ऊर्जा सुरक्षा, आव्हाने व पर्याय’ या विषयावर या व्याख्यानमालेतील 30 वे पुष्प गुंफणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता होणारे व्याख्यान वेळेवर सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेपूर्वी 15 मिनिटे आधी शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’ परिवार व शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
‘पुढारीकार’ कै. डॉ. ग.गो.जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. जाधव यांच्या कार्याचे स्मरण करत शहरात स्केटिंग रॅली काढण्यात येणार आहे. रक्‍तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. यासह प्रेरणाज्योत, फळेवाटप आदी कार्यक्रमांद्वारे डॉ. ग. गो.जाधव यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. डॉ. काकोडकर यांचे भाषण विद्यार्थी, संशोधक, उद्योजक आदींसह सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. हे भाषण दैनिक ‘पुढारी’ ऑनलाईनच्या www.facebook.com/pudharionline या पेजवर पाहता येणार आहे.