Tue, Nov 19, 2019 10:04होमपेज › Kolhapur › ‘फ्युचर डॉक्टर्स’ एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी योग्य पर्याय

‘फ्युचर डॉक्टर्स’ एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी योग्य पर्याय

Published On: Jun 20 2019 2:38PM | Last Updated: Jun 20 2019 2:38PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

 विदेशात एमबीबीएस करून वैद्यकीय क्षेत्रातील  करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्युचर डॉक्टर’ एज्युकेशन सर्व्हिसेस ही संस्था विश्‍वसनीय माध्यम आहे, असा विश्‍वास संस्थेचे संचालक डॉ. अमित बोराडे यांनी व्यक्‍त केला.  विविध योजनांच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणार्‍या संस्थांपासून सावध राहण्याचा सल्‍लाही त्यांनी दिला. 

एक पैसाही डोनेशन न देता व कोणत्याही प्रकारच्या प्रवेश परीक्षेला सामोरे न जाता थेट विदेशात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देणारी विश्‍वसनीय संस्था म्हणून ‘फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस’ या संस्थेची सर्वत्र ओळख आहे. आज तब्बल 3 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत करिअरच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. संस्थेच्या या कार्याची माहिती देण्याबरोबरच विदेशात एमबीबीएस करू इच्छीणार्‍या विद्यार्थी व पालकांसाठी बुधवारी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

दैनिक ‘पुढारी’ आयोजित हा उपक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाला. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. दै. ‘पुढारी’चे जाहिरात व्यवस्थापक शरद कोतेकर यांनी डॉ. बोराडे-पाटील यांचे स्वागत केले. 

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बोराडे-पाटील म्हणाले,  ‘फ्युचर डॉक्टर्स’च्या माध्यमातून आज रशिया, तुर्कस्तान, युक्रेन या देशांत तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. यात मुलींचे प्रमाण 80 टक्के असल्याने परदेशात असूनही अत्यंत सुरक्षित वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी भाषा, मराठमोळे जेवण आणि भारतीय परंपरेला साजेशा आपुलकीच्या 
वातावरणामुळे  विद्यार्थी रमत आहेत.  

या मुख्य मार्गदर्शनानंतर पालक व विद्यार्थी यांच्या प्रश्‍नांना डॉ. बोराडे यांनी उत्तरे दिली. यानिमित्त सध्या परदेशात शिक्षण घेत असलेल्या अभिषेक सूर्यवंशी, स्वप्निल रसाळ, पुष्पक पाटील, अथर्व गडबोजे यांनी ‘फ्युचर डॉक्टर’ संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांची आवर्जून माहिती दिली.