Fri, Sep 21, 2018 21:04होमपेज › Kolhapur › खिद्रापूर येथे कुर्‍हाड हल्ला; युवक गंभीर

खिद्रापूर येथे कुर्‍हाड हल्ला; युवक गंभीर

Published On: May 30 2018 1:30AM | Last Updated: May 30 2018 1:41AMकुरुंदवाड(जि. कोल्‍हापूर) : प्रतिनिधी

खिद्रापूर (ता.शिरोळ) येथे गावात आमच्याबद्दल बदनामीकारक चर्चा करत असल्याच्या गैरसमजुतीतून अल्ताफ लाडखान मोकाशी (वय, 34) या युवकास चार जणांनी मारहाण केली आहे. मोकाशी यास काठी व कुर्‍हाडीने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. या मारामारीत अल्ताफ मोकाशी यांच्या डोक्याला मार लागल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अल्ताफ मोकाशी हा घरात बसलेला असताना मनोज मोकाशी, रुस्तम मोकाशी, मुस्ताक मोकाशी, फिरोज मोकाशी या चार बंधूंनी अल्ताफ मोकाशी यांच्या घरात येऊन आमची गावात बदनामी का करतोस असे म्‍हणत अल्‍ताफवर काठीने व कुर्‍हाडीने वार केले.