कोल्हापूर : पन्‍हाळा हरवला धुक्‍यात!

Last Updated: Nov 09 2019 1:16PM
Responsive image
पन्हाळा येथे आज सकाळी दाट धुके  पसरले होते. धुक्‍यामुळे वाहतूक रोडावली असलयाचे दिसत होते. (छाया—राजू मुजावर , पन्हाळा )


पन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळा व परिसरात आज (ता.९) सकाळी दाट धुके पसरले. दाट धुक्यात पन्हाळा व आसपासचा परिसर हरवला असल्याचे चित्र दिसत होते. धुक्या बरोबरच वातावरणात कमालीचा गारठा देखील पसरला होता, तसेच भरपूर प्रमाणात दव देखील पडत होते. सकाळच्या वेळी धुके पसरायला सुरवात झाली आणि सकाळी दहा वाजेपर्यंत दाट धुक्याची दुलईत पन्हाळा व पन्हाळा परिसर न्हाऊन निघाला. हा नजरा डोळ्‍यात साठवून ठेवण्‍यासारखाच होता. 

परतीच्या  पावसाने सर्वत्र नको-नको केले असताना आता थंडीची चाहूल लागली आहे. दाट धुके व त्‍यातच थंडी पडत असल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर वाहने चालवणे देखील अडचणीचे होत असल्याचे वाहनधारकातून व्यक्त होत आहे. 

आज सकाळी दाट धुके पसरल्यानंतर ढग जमिनीवर खेळत असल्यासारखे वातावरण तयार झाले होते. धुक्यात हरवलेला पन्हाळा  या अनोख्या निसर्ग सौंदर्याने नटला होता.

सांगली : तासगावातील वायफळेत सापडला कोरोनाचा सहावा रुग्ण


वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच 'तिने' संपविली जीवनयात्रा 


नाशिकमध्ये १० नवीन कोरोनाग्रस्त, सव्वा वर्षाच्या बालिकेचा समावेश  


यूपीएससी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर


सांगली : शिवाजीनगर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक 


राज्यसभेसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाला काँग्रेसकडून हिरवा कंदील


शिवभोजन थाळीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


कोल्हापूरकरांना दिलासा; एकूण ४०० रूग्णांना डिस्चार्ज


चिंता वाढवणारा कोरोनाग्रस्त भारत, २ दिवसांत २५ हजार नवे रुग्ण 


कोल्हापूर : पन्हाळ्यातील खचलेल्या मुख्य रस्त्याचे दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू