Sun, Sep 23, 2018 05:01होमपेज › Kolhapur › फ्लॅट फोडून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास 

फ्लॅट फोडून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास 

Published On: Jul 29 2018 1:22AM | Last Updated: Jul 29 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ताराबाई पार्कातील धनश्री पॅराडाईज इमारतीतील तीन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. एका फ्लॅटमधील पाच तोळे दागिने, रोख 2 लाख 42 हजार असा सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. तर याच इमारतीतील आणखी दोन फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. गौतम सूर्यप्रकाश पंडित यांनी ताराबाई पार्कातील धनश्री पॅराडाईज इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला आहे. ते सत्यसाईबाबा देवस्थानला गेले होते. शनिवारी ते परतले असता फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसून आले. बेडरूममधील लोखंडी कपाटातील कप्पे उचकटून रोख 2 लाख 42 हजार, दोन तोळ्यांची सोनसाखळी, तीन तोळ्यांचे ब्रेसलेट असा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.