Sun, Sep 23, 2018 06:06होमपेज › Kolhapur › मासे झाले स्वस्त

मासे झाले स्वस्त

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोकणातून कोल्हापूरच्या बाजार पेठेत माशांची आवक वाढली आहे. यामुळे माशांच्या घरात मोठी घसरण झाली आहे. रत्नागिरी, मालवण, देवगड, कारवार परिसरातून कोल्हापुरात समुद्री माशांची आवक होते. पहाटेच्या सुमारास मासे मटण मार्केटमध्ये येतात. दररोज 4 ते 5 टन माशांची आवक होते. मागील आवड्यात सुरमई माशांचा दर 500 रुपयांवर तर पापलेट 12 00 रुपयावर पोहोचला होता.

सध्या सुरमईचा दर 360 ते 400 व पापलेट 800 ते 1000 रुपये किलो आहे. अन्य माशांचे दर असे - सुरमई कटिंग 550 ते 600, बॉईल पापलेट 600, छोटी कोळंबी 200, मोठी कोळंबी 400, बांगडा 120 ते 140, बोंबील 160, मांदेली 100 रुपये प्रतिकिलोचा दर आहे. माशांच्या दरात 200 रुपयांची  घसरण झाली आहे. त्यामुळे खवय्यांना माशांची मनसोक्‍त तल्लप भागवता येणार आहे. गत आठवड्यात माशांच्या दरात मोठी वाढ झाल्याने माशांच्या मार्केटमध्ये ग्राहकांची वानवा दिसत होती, त्यामुळे मस्य बाजारपेठ शांत होती. सोमवारी माशांच्या दरात घसरण झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.