Wed, Apr 24, 2019 01:40होमपेज › Kolhapur › चांगभलंच्या गजरात पाकाळणी

चांगभलंच्या गजरात पाकाळणी

Published On: Apr 16 2018 12:28AM | Last Updated: Apr 15 2018 11:03PMजोतिबा  : वार्ताहर

चांगभलंच्या गजरात जोतिबाची दुसरी पाकाळणी रविवारी उत्साहात झाली. सोमवारी मंदिर स्वच्छता करून मंगळवारी महाप्रसाद वाटपाने चैत्री यात्रेची सांगता होणार आहे.\

जोतिबा देवाच्या पाकाळणीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी अभिषेक, महापूजा, धूपारती सोहळा झाला. मंदिरासभोवती चारपदरी दर्शन रांगा लागल्या होत्या. दुपारी 12 नंतर मंदिराबाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शन रांग लागली. सायं. 7 वाजता धूपारती झाली. रात्री 8.30 वाजता श्री जोतिबा देवाची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. ‘श्रीं’चे मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह पालखी निघाली. भाविकांनी गुलाल-खोबर्‍याची उधळण करून चांगभलंचा गजर केला. 

यावेळी देवस्थान समिती कार्यालयाचे प्रभारी, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, गावकर, ग्रामस्थ, पुजारी व भाविक उपस्थित होते. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता 
झाली.

रात्री 10 वाजता स्थानिक ग्रामस्थ, पुजारी, खंडकरी सेवा मंडळाच्या 500 ते 600 कार्यकर्त्यांनी मंदिराची स्वच्छता केली. आज (दि. 16) पारंपरिक पद्धतीने पाण्याचे फवारे मारून मंदिर स्वच्छ केले जाणार आहे. त्यामुळे काही काळ जोतिबा दर्शन बंद राहील. मंगळवारी (दि. 17) जोतिबा समस्त पुजारी यांच्यातर्फे गाव भंडारा होणार आहे. दुपारी 2 वाजता स्थानिक पुजारी मंडळाची सासन काठी मिरवणूक  निघेल. रात्री भजन व डवरी गीताचा कार्यक्रम  होईल.