Sun, Apr 21, 2019 14:32होमपेज › Kolhapur › कर्जबाजारीपणाला कंटाळून म्हाळुंगेत शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून म्हाळुंगेत शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 1:14AM

बुकमार्क करा

चंदगड : प्रतिनिधी

3कर्जबाजारीपणाला कंटाळून इनाम म्हाळुंगे येथील शेतकरी कृष्णा तुकाराम गावडे (वय 44) याने रविवारी रात्री गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.  

गावडे याने एचडीएफसी बँकेतून शेतीसाठी 10 लाखांचे कर्ज घेतले होते. तसेच इतरही बँका, नातेवाईकांकडून कर्ज घेतले होते. नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. गावडे हे रविवारी रात्री दहा वाजता जेवण करून झोपण्यासाठी खोलीत गेले. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी छताला दोरी बांधून गळफास लावून घेतला. हे लक्षात आल्यावर त्यांच्या पत्नीने मदतीसाठी धावा केला. त्यांना खाली उतरेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.