Sun, Aug 18, 2019 21:02होमपेज › Kolhapur › दीड लाखावरील कर्जदारांना मुदतवाढ

दीड लाखावरील कर्जदारांना मुदतवाढ

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना 1.50 लाखापर्यंत कर्जमाफीची योजना शासनाने जाहीर केली. दीड लाखावर थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांना 30 जूनपर्यंत उर्वरित रक्‍कम भरण्यासाठी मुभा देण्यात आली होती. हीच मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

राज्य शासनाने 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 85 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. चार कोटी 34 लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखावरील शेतकर्‍यांना अगोदर उर्वरित रक्‍कम भरा, त्यानंतर कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाईल, असे शासनाने जाहीर केले आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाखावर 950 शेतकरी आहेत. त्यातील सुमारे 400 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्‍कम भरून कर्जमाफीचा लाभ घेतला आहे, तर सुमारे 500 शेतकर्‍यांनी उद्यापही उर्वरित रक्‍कम भरलेली नाही. त्यामुळे ओटीएस योजनेंतर्गत शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी शासनाने 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. जे शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतील ग्रीन लिस्टमध्ये पात्र ठरले आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, तरी संबंधित शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले आहे.