Tue, Jul 23, 2019 02:48होमपेज › Kolhapur › गूळ उत्पादक शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य : हिंगमिरे

गूळ उत्पादक शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य : हिंगमिरे

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:20AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

10 ते 15 शेतकर्‍यांचा गट किंवा वैयक्‍तिक शेतकरी मानांकन घेऊ शकतो, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पुण्याचे जीआय मानांकन सल्लगार गणेश हिंगमिरे यांनी दिली. गुळाला जीआय मानांकन मिळविण्यासासाठी बाजार समितीच्या वतीने गुरुवारी गूळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यशाळेत हिगमिरे यांनी कोल्हापुरी गुळास मिळालेल्या भौगोलिक उपदर्शन जीआयचे महत्त पटवून दिले. भौगोलिक उपदर्शन (जी.आय.) कसा मिळाला तसेच जी. आय. मानांकनानुसार गूळ उत्पादन व त्याच्या दर्जासंबंधी शेतकर्‍यांना माहिती दिली. शेतकर्‍यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन कार्यशाळेत करण्यात आले. यावेळी माजी सभापती परशुराम खुडे, दशरथ माने, उदयसिंह पाटील, भगवान काटे, बाबुराव खोत, नेताजी पाटील, नाना पाटील, सचिव दिलीप देसाई, उपसचिव मोहन सालपे आदी उपस्थित होते. उपसभापती अमित कांबळे यांनी आभार मानले. 

जिल्ह्यात किमान 250 ते 300 गुर्‍हाळ घर मालक आहेत. मात्र, या कार्यशाळेला 12 शेतकर्‍यांनी हजेरी लावली होती. इतक्या महत्त्वाच्या कार्यशाळेला शेतकर्‍यांनी संख्या अपुरी असल्याने, याबाबत उपस्थित पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरू होती.