Sat, Mar 23, 2019 16:34होमपेज › Kolhapur › शेणगाव येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार

शेणगाव येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार

Published On: Jan 24 2018 12:02AM | Last Updated: Jan 24 2018 12:02AMगारगोटी : प्रतिनिधी 

गारगोटी कडगाव रोडवर शेणगाव येथील विठ्ठलाई ओढ्यानजीक ट्रॅक्टर पल्टीहोऊन ट्राॅलीखाली सापडून एक शेतकरी ठार झाला. संजय नाना राणे  ( रा. सोनारवाडी ) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.

खडीने भरलेला ट्रॅक्टर एम (09 सीजे 8103) गारगोटीकडे धावत होता. शेणगाव ओढ्यानजीक ट्रॅक्टर ट्राॅलीसह पल्टी झाला. यावेळी संजय नाना राणे ट्राॅलीखाली सापडले गेले. तहसीलदार अमरदिप वाकडे व नागरिकांनी संजयला बाहेर काढून उपचारासाठी गारगोटी रूग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या बाबतची वर्दी पोलीस पाटील विजय साळोखे यानी पोलिसात दिली आहे. संजयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत. संजय राणेंच्या पश्चात पत्नी, मुलगाआणि मुलगी असा परिवार आहे.