Sun, Nov 18, 2018 09:38होमपेज › Kolhapur › विश्वास नांगरे-पाटलांच्या बदलीची अफवाच!

विश्वास नांगरे-पाटलांच्या बदलीची अफवाच!

Published On: Dec 26 2017 8:01PM | Last Updated: Dec 27 2017 9:48AM

बुकमार्क करा

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्‍हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची बदली झाल्याची अफवा पसरली होती. तशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. मात्र, अशा प्रकारचा कोणताही आदेश आला नसून, माझी बदली झाली नाही, असे खुद्द नांगरे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

नांगरे-पाटील यांची बदली होणार असून, त्यांच्या जागी सांगलीचे तत्‍कालीन पोलिस अधीक्षक व मुंबईतील उपायुक्‍त कृष्‍णप्रकाश यांची वर्णी लागणार असल्याचे वृत्त सांगलीतील एका स्‍थानिक दैनिकाने प्रसिद्ध केले होते. याच वृत्तामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातून याबाबतचे आदेश काढण्यात येणार असून आज, मंगळवारी आदेश निघण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 

या वृत्तपत्रातील हे वृत्तही त्यानंतर व्‍हायरल झाले होते. दिवसभर नांगरे पाटलांची बदली, कृष्‍णप्रकाश नवे विशेष पोलिस महानिरीक्षक असे मेसेज फिरू लागले होते. त्यानंतर नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तसा आदेश प्राप्‍त झाला नसून ती अफवा असल्याचे सांगितले. 

वाचा : गुंडांच्या बेहिशेबी मालमत्तांवर टाच आणणार : नांगरे-पाटील