Fri, Jul 19, 2019 01:15होमपेज › Kolhapur › कबनूरच्या तरुणास अकरा वर्षे सक्‍तमजुरी

कबनूरच्या तरुणास अकरा वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:26AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी

खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी   झुल्फेकार ऊर्फ बाबू महंमद कुरेशी  (वय 27, रा. दत्तनगर, कबनूर) याला 11 वर्षे सक्‍तमजुरी आणि 20 हजार 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी सुनावली. 

कुरेशी याने अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवून दत्तनगर येथील शेतामध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुरेशीने तिला मारहाण केली. ही घटना 9 जून 2013 मध्ये घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.  कुरेशीला 20 जून रोजी अटक  करून येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 
24 जून 2016 रोजी  सुनावणीस सुरुवात झाली. सरकारी पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी, पंच, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अर्चना बोदडे, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्‍तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून ही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील 20 हजार रुपये पीडित मुलीला नुकसानभरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले.