Thu, Apr 25, 2019 07:33होमपेज › Kolhapur › कोकरे परिसरात हत्तींचा धुमाकूळ

कोकरे परिसरात हत्तींचा धुमाकूळ

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 13 2017 11:49PM

बुकमार्क करा

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील पश्‍चिम भागात तीन हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. हत्तींनी कोकरे येथील गोविंद कांबळे व सीताराम कांबळे यांच्या चार एकर शेतातील ऊस व केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वन विभागाने हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

हत्तींचा मुक्‍काम सध्या कोकरे परिसरात आहे. या भागात हत्तींनी प्रचंड दहशत माजवली आहे. कोकरे येथील गोविंद कांबळे, सीताराम कांबळे यांच्या कमलशेत नावाच्या शेतातील चार एकरांतील ऊस व केळी पिकांत हत्तींनी धुडगूस घातला आहे. वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे केले. या हत्तींची गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्याच्या पश्‍चिम भागात दहशत आहे. गणेश चतुर्थीच्या दरम्यान याच हत्तींचा कळप वाघोत्रे परिसरात होता.

त्यानंतर काही दिवस हा कळप दोडामार्ग परिसरात स्थिरावला होता.त्यानंतर हत्ती तिलारी घाटातून चंदगड तालुक्यात आल्याचे वनविभागाने सांगितले. हत्ती कोकरे परिसरात आल्याचे वन विभागाला कळताच  त्यांना पिटाळण्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरू ठेवले होते. सूर बाँम्ब, फटाके यांचा वापर करून हत्तींना परतवून लावण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे केवळ दोन शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान झाले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे केले.