Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Kolhapur › कळसगादे परिसरात टस्करचा धुमाकूळ

कळसगादे परिसरात टस्करचा धुमाकूळ

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:26PMचंदगडः प्रतिनिधी

कळसगादे परिसरात टस्कराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आपली पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागत आहे. त्यातच टस्कराने धुमाकूळ घातल्याने या परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. 

गेल्या पंधरा वर्षांपासून हत्ती आणि शेतकरी यांच्यातला संघर्ष कमी झाला नाही. हत्तींकडून शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. भीतीच्या छायेखाली वावरत असताना शेती करणे महाकठीण काम शेतकर्‍यांना झाले आहे. कळसगादे येथील विठ्ठल मोतीराम गावडे, संजय मोतीराम गावडे यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले. दोनवेळा याच शेतकर्‍यांच्या शेतात हत्तींचा कळप दाखल झाला होता. त्याच उसाच्या मळ्यात टस्काराचा वावर आहे. या टस्कराने लक्ष्मण बारकु दळवी यांची बैलगाडीही मोडली होती. टस्कर बॉम्ब व फटाक्यांना दाद देत नसल्याने ग्रामस्थ भयभती झाले आहेत. वनक्षेत्रपाल एम. एन. परब, वनपाल अमोल शिंदे, नंदकुमार पाटील, वनरक्षक बी. के. जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसानीचे पंचनामे केले.