Sun, Jul 21, 2019 09:49होमपेज › Kolhapur › कृषी पंप भारनियमन बंद पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा

कृषी पंप भारनियमन बंद पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 1:13AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मागणीएवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषी पंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रात्री 10 तास व दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने पूर्ववत थ्री फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारी मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे.

सप्टेंबरमध्ये कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. परिणामी, घरगुती, व्यापारी, औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांना भारनियमनाचा झटका सहन करावा लागला. कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळात बदल करून रात्री आठ तास व दिवसा आठ तास अशा पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येत होता.