Tue, Nov 20, 2018 00:12होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : खानापूर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

कोल्‍हापूर : खानापूर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

Published On: Jun 25 2018 7:16PM | Last Updated: Jun 25 2018 7:16PMगारगोटी : प्रतिनिधी

खानापूर (ता. भुदरगड) येथील आशितोष आनंदराव पाटील (वय-20) या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. 
आशितोष पाटील हा खानापूर येथील हिरो होंडा शोरूम या दुकानात कामाला होता. आज सकाळी ११ च्या सुमारास दुचाकी गाडी सर्व्हीसिंग करत होता. यावेळी त्याला विजेचा शॉक लागून तो जागीच बेशुद्ध होऊन पडला. त्याला उपचारासाठी गारगोटी येथे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. 

उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आशितोष हा बारावीच्या वर्गात शिकत होता.  त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.