Sun, May 26, 2019 12:45होमपेज › Kolhapur › आजपासून प्रचाराची रणधुमाळी

आजपासून प्रचाराची रणधुमाळी

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:05AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा मुख्याध्यापक संघ निवडणुकीसाठी छत्रपती शाहू सत्तारूढ आघाडी व राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीत दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवार (दि.15) पासून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची शिखर संस्था आहे. दीड वर्षानंतर निवडणूक लागली असून विविध 25 जागांसाठी 49 उमदेवार निवडणुकीत उभे आहेत. विरोधकांनी माघारीनंतर तत्काळ पॅनेल जाहीर करून निवडणुकीतील चुरस वाढविली आहे. दोन्ही गटांकडून तालुकावार मतदारांच्या भेटी-गाठी सुरू झाल्या असून प्रचारास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी तालुकास्तरावर सभा घेऊन मुख्याध्यापकांसमोर आपली भूमिका मांडत आहेत. तालुक्यातील उमेदवारांनी आपली मते फुटणार यासाठी प्रचाराची रणनिती आखली आहे. 

छत्रपती शाहू आघाडीच्या वतीने मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष व्ही.जी.पोवार यांच्या व्हन्‍नूर (ता.कागल) येथील दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीचा शाहूवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावे येथे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.