Thu, Nov 15, 2018 03:27होमपेज › Kolhapur › निवडणूक वादातून मारामारी; महिलासह चौघे जखमी

निवडणूक वादातून मारामारी; महिलासह चौघे जखमी

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या वादातून केर्ले (ता. करवीर) येथे दोन गटात झालेल्या मारामारीत महिलासह चौघेजण गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेमुळे काही काळ तणाव होता.करवीर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

शुभांगी प्रसाद पाटील (वय 22), प्रसाद दत्तात्रय पाटील (30), सुचिता सर्जेराव पाटील (40), सर्जेराव रामचंद्र पाटील (50, रा.केर्ले, ता.करवीर) अशी जखमींची नावे आहेत. शासकीय रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोनही गटातील सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केर्ली ग्रा.पं.ची पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी ( दि.28) निकाल लागला. फटाके फोडण्याच्या कारणातून दोन गटात हमरी-तुमरी झाली होती. तथापि गावातील प्रमुखांनी दोनही गटांना सबुरीचा सल्ला देऊन समेट घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज दुपारी दोन्ही गटातील समर्थकांत हाणामारी झाली. लोखंडी गज, काठ्यांचा सर्रास वापर झाला.त्यात दोन महिलासह चौघेजण जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.