Tue, Mar 19, 2019 09:47होमपेज › Kolhapur › प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक 

प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक 

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:25AM

बुकमार्क करा
गारगोटी : प्रतिनिधी

राधानगरी विधानसभा मतदारसंघातील धामणी, सर्फनाला व नागणवाडी यासारख्या प्रलंबित प्रकल्पांचे काम मार्गी लावण्यासाठी तसेच गारगोटी नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊ, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ  शिंदे यांनी दिले. आमदार प्रकाश आबीटकर यांनी विधानसभेतील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद‍्गार त्यांनी यावेळी काढले. 

येथील कामगार नेते आनंदराव आबीटकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित युवा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार दिनकरराव जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आनंदराव आबीटकर यांचा सत्कार मंत्री  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मतदारसंघातील सर्व नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रगतिशील शेतकरी व विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर यांची भाषणे झाली. माजी आमदार संजय घाटगे, अशोक चराटी, उदयसिंह पाटील-कौलवकर, पी. डी. धुंदरे, के. जी. नांदेकर, विजयसिंह मोरे,  प्रा. अर्जुन आबीटकर यावेळी उपस्थित होते.