Wed, Apr 24, 2019 15:58होमपेज › Kolhapur › भेंडवडेतील 9 अल्पवयीन बोगस मतदारांवर गुन्हा

भेंडवडेतील 9 अल्पवयीन बोगस मतदारांवर गुन्हा

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:27AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रांत फेरफार केल्याप्रकरणी भेंडवडे (ता. हातकणंगले) येथील 9 अल्पवयीन मुलांवर वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत विनोद देसाई यांनी हरकत अर्ज दाखल केला होता. 

ग्रामपंचायत निवडणूक 2017 च्या प्रारूप मतदार यादीत काही अल्पवयीन मुलांची नावे समाविष्ट असल्याबाबत हरकत घेण्यात आली होती. याची चौकशी केल्यानंतर संबंधित मुलांनी शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, शाळा सोडल्याचे दाखले, जन्मदाखल्यावरील तारखांत खाडाखोड केल्याचे उघड झाले. वय बसत नसताना या 9 जणांनी कागदपत्रांत फेरफार करून मतदार यादीत नावे समाविष्ट करून घेतल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 24 मार्च 2017 ते 6 सप्टेंबर 2017 कालावधीत झाल्याचे तपासात पुढे आले आहे. याबाबतची फिर्याद सर्कल लक्ष्मण उत्तमराव बिक्‍कड (वय 38, रा. जयसिंगपूर) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. 

या सर्व मुलांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान केले आहे किंवा नाही याचा तपास सुरू असल्याचे तपासी अधिकारी गवारी यांनी सांगितले.