Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Kolhapur › बनावट जात प्रमाणपत्र बनवणार्‍या दोघांना अटक

बनावट जात प्रमाणपत्र बनवणार्‍या दोघांना अटक

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना बनावट जात प्रमाणपत्र तयार करून देणार्‍या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित मुख्तार अहमद अब्दुल गफार (वय 52, रा. बिस्मिल्ला कॉलनी औरंगाबाद) व अकिल गफार बेग (47, रा. अविष्कार कॉलनी, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात उभे केले असता, 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशावेळी सय्यद शरिक नवाज सय्यद मोहम्मद वहाब (आलमगीर कॉलनी, औरंगाबाद), जितन परविन अश्फाक खान (रा. रूपा नगर, कुर्ला, मुंबई) या दोघांनी बनावट जात प्रमाणपत्रे दिली होती. याद्वारे त्यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांतून प्रवेश मिळवला. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर दोघांकडून खुलासा मागविण्यात आला होता; पण दोघांनी खुलासा न दिल्याने 24 ऑक्टोबर 2016 रोजी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

बनावट जात प्रमाणपत्रे बनविणार्‍या गफार आणि बेग यांचा शोध पोलिस घेत होते. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दादासो पवार आणि त्यांच्या पथकाने या दोघांना धुळ्यातून अटक केली.