Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Kolhapur › नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापारी, सामान्य जनतेच्या संकटात भर

नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापारी, सामान्य जनतेच्या संकटात भर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


जयसिंगपूर : प्रतिनिधी

नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापारी, व्यावसायिक, सर्वसामान्य जनतेच्या संकटात भर पडली आहे. अनवधनाने या पापात आम्हीपण सहभागी आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सत्ता जाऊ दे म्हणून देव पाण्यात घालून आम्ही हिरिरीने प्रचारात उतरलो. अच्छे दिनची वाट पाहिली मात्र गेल्या तीन वर्षांत अपेक्षाभंग झाला, अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्‍त केली.

येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात व्यापारी संवादमध्ये ते बोलत होते. आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष डॉ. निता माने, मंत्री दीपक केसरकर, खा. गजानन कीर्तीकर व विनायक राऊत, विजय शिवतारे, मुरलीधर जाधव, सतीश मलमे, मधुकर पाटील उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, एका रात्रीत नोटाबंदी केली. सर्वसामान्यांना कष्टाच्या पैशासाठी रांगेत उभे रहावे लागले. शेतकर्‍यांना गुन्हेगाराची वागणूक देण्यात आली. त्यात जीएसटी लादून  संकटात भर घातली.

यावेळी विनोद घोडावत, सुदर्शन कदम, डॉ. जयश्री आवळेकर, डॉ. उर्मिला देसाई, गजाधर मानधना,   जिल्हा डिलर असोसिएशनचे अध्यक्ष देसाई यांनी जीएसटीसह व्यवसायात येणार्‍या अडचणीचा पाढा वाचला. 

मी तुमच्या बरोबर व्यापारी, डॉक्टर, टॅक्स सल्लागार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर ठाकरे म्हणाले, तुम्हाला शिवसेनेकडूनच न्याय मिळेल. उद्धव ठाकरे हा दुतोंडी आहे अशी टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. मात्र, तुमच्याकडे हिंमत असेल तर गुजरातच्या व्यापार्‍यासारखे रस्त्यावर उतरा मी तुमचे नेतृत्व करेन अशी ग्वाही दिली.