Sun, Aug 18, 2019 21:29होमपेज › Kolhapur › दूधगंगा डाव्या कालव्याचे काम रोखले 

दूधगंगा डाव्या कालव्याचे काम रोखले 

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:17AM

बुकमार्क करा
नंदगाव : वार्ताहर

दिंडनेर्ली (ता. करवीर) दूधगंगा डाव्या कालव्याच्या प्रकल्पासाठी परिसरातील शेतकर्‍यांची जमीन सरकारने संपादित केली आहे. 2014 साली पहिल्यांदा जमीन संपादित केली. त्यावेळी संबंधित शेतकर्‍यांना आठ हजारांच्या आसपास असा अत्यल्प शासकीय दर मिळाला होता. आठ हजार दर मान्य नसलेल्या शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली.

त्यावेळी त्या शेतकर्‍यांनी साधरणत: एक लाख आठ हजार रुपये दरम्यान दर मिळावा एकाच गट नंबरातील भावाभावांच्यात हिश्श्यांना लाखांच्या फरकाने मिळालेल्या दरांमुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे दिंडनेर्ली परिसरातील शेतकर्‍यांनी दरातील तफावत दूर करण्यासाठी कालवा बंद ठेवण्याची भूमिका घेतली. यावेळी दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले व कालव्याचे काम सुरू ठेवले. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना पत्र पाठवून 90 जमीनधारक शेतकर्‍यांना महसूल विभागामार्फत योग्य दर मिळावा, अशी मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास दोन दिवसांत कालव्याचे काम शेतकरी बंद करणार आहेत. तरी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली; पण जलसंपदा विभागाने याकडे दुर्लक्ष केले. दिंडनेर्ली अन्याय निवारण कृती समिती तर्फे कालव्याचे काम बंद पाडण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इस्पुर्ली सहायक फौजदार अर्जुन पोवार यांनी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावेळी दिंडनेर्ली येथील शेतकरी, महिला, पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित हेाता.