Sat, May 30, 2020 05:23होमपेज › Kolhapur › तुडयेत बाटली आडवी होणार की उभी राहणार?

तुडयेत बाटली आडवी होणार की उभी राहणार?

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:20AM

बुकमार्क करा
चंदगड : प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून तुडये येथील रणरागिणींनी दारूबंदीविरोधात सुरू केलेल्या लढ्याला यश आले असून, बाटली आडवी करायची की, उभी ठेवायची हे आज, रविवारी (दि. 14) होणार्‍या मतदानानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्पष्ट होणार आहे. संक्रांती दिवशीच मतदान होणार असल्याने कुणाची संक्रांत साजरी होणार, याकडे तुडये पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे. मतदानासाठी महिलांनी जोरदार तयारी केली असून, घराघरांत जाऊन बाटली आडवी करण्यासाठीचा प्रचार केला आहे. गावातील 1602 महिला आपल्या मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.  

तुडये येथे चार ठिकाणी दारू दुकाने आहेत. दारूच्या दुकानांमुळे तरुण व्यसनी बनले आहेत. या दुकानांची परवानगी रद्द व्हावी व ही दुकाने अन्यत्र हलवावीत, अशी मागणी दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये महिलांनी केली होती. महिलांचे मतदान घेण्यासंदर्भात शासनाचा आदेश आला असल्याने आज तुडये गावात पोलिस बंदोबस्तात मतदान होणार आहे. तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार एम. डी. नांगरे व नायब तहसीलदार आर. टी. झाजरी हे काम पाहणार आहेत.