Tue, Apr 23, 2019 06:25होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड पालिकेत डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

कुरूंदवाड पालिकेत डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

Published On: Jul 31 2018 12:50PM | Last Updated: Jul 31 2018 12:50PMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

कुरूंदवाड पालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ.योगेश प्रतापसिंह जाधव यांची महाराष्ट्र राज्याच्या उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. अभिनंदनाच्या ठरावासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. 

कुरूंदवाड पालिका सभागृहात आज सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. भाजपाचे पक्षप्रतोद नगरसेवक उदय डांगे यांनी डॉ.योगेश जाधव यांची उर्वरीत वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल अभिनंदनाचा ठराव सुचविला तर त्यास अनुमोदन राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजीत पाटील यांनी दिले.

यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर   उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, नगरसेवक रामचंद्र डांगे फारूख जमादार, सुनील चव्हाण, किरणसिंह जोग, जवाहर पाटील, दीपक गायकवाड, अनुप मधाळे, नरगीस बारगीर, सुजाता डांगे, सुशिला भबिरे, गीता बागलकोटे, समरीन गरगरे, ममताज बागवान, स्नेहल कांबळे, जरीना गोलंदाज, सुजाता मालवेकर उपस्थित होते.