Tue, Apr 23, 2019 13:52होमपेज › Kolhapur › दोनवडेत शॉर्टसर्किटने गवताला आग

दोनवडेत शॉर्टसर्किटने गवताला आग

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:20AM

बुकमार्क करा
दोनवडे :  वार्ताहर

दोनवडे (ता. करवीर) येथे भररस्त्यात गवत घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ट्रॉली भरून आणलेले गवत रस्त्यावरच खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

दोनवडे येथील सर्जेराव नलवडे   धोंडेवाडी येथून ट्रॉलीतून गवत घेऊन आले होते. गावात फाट्यावरून येत असताना केदारनाथ पाणीपुरवठाशेजारी सर्व्हिस वायरला स्पर्श झाल्याने ट्रॉलीतील गवताने पेट घेतला. ग्रामस्थांनी चालकाला सांगितल्यानंतर ट्रॅक्टर थांबवून त्याने उडी मारली. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण वाळलेले गवत असल्याने नियंत्रण येत नव्हते. फुलेवाडी अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.