Sun, Aug 25, 2019 12:22होमपेज › Kolhapur › जिल्हा बँक आयपीडीआय बाँडची विक्री करणार : मुश्रीफ

जिल्हा बँक आयपीडीआय बाँडची विक्री करणार : मुश्रीफ

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा सहकारी बँकेला 50 कोटींच्या आयपीडीआय (इनोव्हेटिव्ह पर्पेच्युअल डेब्ट इन्स्टूमेंट) बॉण्डची  विक्री करण्यास परवानगी दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बाँड विक्रीची सुरुवात येत्या 12 तारखेला होणार असून बँकेच्या सर्व शाखात 31 मार्चपर्यंत या बाँडची विक्री होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक भैया माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, बँकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बँकेकडे बाँड विक्रीस परवानगी मागितली होती. ही परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. हे बाँड व्यक्‍ती, संयुक्‍त, कंपनी, भागीदारी कंपनी, धर्मादाय संस्था, सहकारी संस्थांना घेता येणार आहेत. बाँडची किंमत व्यक्‍तीसाठी 10 हजार रुपये व त्या पटीत खरेदी करता येणार आहेत. तर संस्थांसाठी 50 हजार व त्या पटीत या बाँडची खरेदी करता येणार आहे. 

ज्या व्यक्‍ती, संस्था या बाँडची खरेदी करणार आहेत त्यांना दसादशे 9 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. या बाँडच्या तारणावर कर्ज, अधिकर्ष, अ‍ॅडव्हान्स मंजूर होणार नाही.तसेच या बॉण्डवर कोणत्याही स्वरूपाचा बोजा, गहाण अथवा ताबा बँक विचारात घेतली जाणार नाही. या बाँडवर आवर्ती स्वरुपाचे व्याजाचा पर्याय असणार नाही. हे बाँड अहस्तांतरणीय आहे. या बाँडशी संबंधित वाद, व्यवहार, न्यायप्रविष्ट बाबी कोल्हापूर न्यायालय परिक्षेत्राच्या अधिन राहणार आहेत.