Mon, Mar 25, 2019 13:25होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : तेरवाडजवळ टँकर पलटी; वाहतूक विस्‍कळीत

कोल्‍हापूर : तेरवाडजवळ टँकर पलटी; वाहतूक विस्‍कळीत

Published On: Jun 07 2018 6:31PM | Last Updated: Jun 07 2018 6:31PMकुरूंदवाड : प्रतिनिधी 

तेरवाड (ता. शिरोळ) येथील खुरपे मळ्याजवळ १२ हजार लिटर डिझेलने भरलेला टँकर रस्त्याच्या साइडपट्टीवर दबून पलटी झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा तेरवाड हेरवाडकडील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

डिझेलला गळती लागली असून घटनास्थळी पोलिस व अग्निशामक पथक दाखल झाले आहे. पाचशे मीटर अंतरावर  रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद असल्याने बसमधील प्रवासी पायी चालत जात आहेत.

आज दुपारी साडे चार वाजता सुमारास मिरजहून हेरवाड-तेरवाड मार्गे डिझेलने भरलेला( क्र. एमएच ०८ एच ०८६९) हा टँकर चालक अजहर मोमीन (रा. बोरगाव) चंदगड तालुक्यातील तुडये या गावी जात असताना हेरवाडजवळ खुरपे मळ्यानजीक रस्त्याच्या साइडपट्टीवर टँकर दबून पलटी झाला. दरम्यान टँकर उभा करण्याचे काम सुरू आहे.