Thu, Apr 25, 2019 04:12होमपेज › Kolhapur › परीक्षेतून फौजदार; पण नोकरी कॉन्स्टेबलचीच!

परीक्षेतून फौजदार; पण नोकरी कॉन्स्टेबलचीच!

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : गौरव डोंगरे

खात्यांतर्गत परीक्षेतून फौजदार झालेल्या 828 उमेदवारांचे डोळे शासनाच्या आदेशाकडे लागून राहिले आहेत. 16 नोव्हेंबरला नाशिक येथे प्रशिक्षणाला हजर होण्याचे आदेश मिळूनही गृह विभागाने याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. उत्तीर्ण होऊनही जिल्ह्यातील दहा जणांना कॉन्स्टेबल म्हणूनच काम करावे लागत आहे. 

खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या फौजदारपदासाठी 31 ऑगस्ट 2016 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली तर 21 ते 30 नोव्हेंबर दरम्यान शारीरिक चाचणी घेण्यात आली. लोकसेवा आयोगाने 5 मे 2017 रोजी निकाल जाहीर केला.  राज्यातून 25 हजारांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातून 828 उमेदवार उत्तीर्ण झाले. या सर्वांना नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अ‍ॅकॅडमीत पोलिस निरीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचा आदेश प्राप्‍त झाला. 

मात्र, काही अनुत्तीर्ण उमेदवारांनी मुंबई मॅट कोर्टात अपिल करून प्रशिक्षणाला स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली. आतापर्यंत मॅट, उच्च न्यायालय यासह सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने या नेमणुकीला स्थगिती देण्यात आली होती.

जिल्ह्यातील दहा जणांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांत काम करणारे 10 जण फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु, आदेश प्राप्‍त नसल्याने हे सर्वजण कॉन्स्टेबल म्हणूनच पोलिस ठाण्याकडे काम करीत आहेत.