Tue, Feb 19, 2019 06:14होमपेज › Kolhapur › शहरातील आणखी तिघांना डेंग्यूची लागण

शहरातील आणखी तिघांना डेंग्यूची लागण

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 1:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील आणखी तिघांना डेंग्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. राजारामपुरीतील दोघे व लक्ष्मीपुरीत राहणार्‍या एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. जूनपासून आतापर्यंत खासगी रुग्णालयातील 55 व सीपीआरमधील 42 अशा 95 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

शहरात डेंग्यूचा फैलाव होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पाच पथके तैनात करून मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी विविध ठिकाणी जाऊन पथकांनी 2554 घरांचा सर्व्हे केला. 15 हजारांवर नागरिकांची माहिती घेतली. 22 तापाचे रुग्ण आढळले असून त्यातील 7 रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. 6 रुग्णांच्या रक्‍ताचे नमुने घेण्यात आले आहेत. 5913 पाणी साठवणुकीचे भांडी तपासली असून त्यातील 257 भांड्यांत डेंग्यूच्या आळ्या सापडल्या. आरोग्य विभागाच्या पथकाने औषधे टाकून या अळ्या नष्ट केल्या. तसेच संबंधित परिसरात धूर व औषध फवारणी करण्यात आली.