दिल्लीतील तबलिगी जमातीत गेलेल्या कोल्हापुरातील २१ जणांचा शोध लागला  (video)

Last Updated: Apr 01 2020 5:57PM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील जमातीतून कोल्हापूर जिल्ह्यात परतलेल्या २१ जणांचा शोध लागल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (दि.1 ) पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी केंद्राकडून आलेल्या २१ जणांच्या यादी पैकी १९ जण दिल्लीतील त्या तबलिगी जमातीत गेले होते.  त्यापैकी काही लोक कोल्हापुरात परतले आहेत तर काही लोक अजूनही विविध राज्यात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील तबलिगी जमातीतून तब्बल अडीच हजारच्यावर लोकांना काल बाहेर काढून क्वारंटाईन करण्यात आले आहे. या जमतीतील २४ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली होती. त्याचबरोबर या तबलिगी जमातीतून अनेक लोक देशातील विविध भागात पसरल्याने जर त्यांच्यापैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीकडून अनेक लोकांना याची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून देशातील विविध भागात गेलेल्या लोकांची यादी स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. 

केंद्राकडून आलेल्या यादीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांनी या तबलिगी जमातीत सहभाग घेतला होता. याबाबत आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, 'केंद्राकडून मिळालेल्या यादीतील २१ जणांपैकी १९ लोकच दिल्लीतील तबलिगी जमातीला गेले होते. त्या सर्वांचा शोध जिल्हा प्रशासनाने लावला आहे. त्यापैकी ९ जण अजूनही दिल्ली, हरियाणा आणि हैदराबाद अशा विविध राज्यांत आहेत. त्यांना तेथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. राहिलेले १० जण कोल्हापुरात परतले आहेत. त्याचा पत्ता लागला आहे त्यांच्याशी बोलणंही झालं आहे. त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यांचे स्वॅब घेऊन त्वरित ते तपासणीसाठी दिले जातील. कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही.'

याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी, कोल्हापुरात बाहेरच्या जिल्ह्यातून आणि परदेशातून आलेल्या जवळपास 70 हजार लोकांवर ग्राम समिती आणि प्रभाग समितीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांचा वैयक्तीक फॉलोअप ठेवला जात आहे. त्यांची रोज आरोग्य तपासणी केली जात आहे. जर लक्षणे आढळली तर त्यांना लगेच सीपीआरमध्ये तपासणीसाठी आणून आवश्यकता भासली तर त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत अशी माहिती दिली. 

जळगाव : दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोरोनाचा शिरकाव 


अपघातातून बरे झालेले १६ मजूर झारखंडला रवाना


राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : नारायण राणे


निवासी डॉक्टरांना दिलासा; ९ दिवस काम आणि ६ दिवस क्वारंटाईन सुट्टी


वाधवान पिता-पुत्रांना जामीन नाकारला


भारतात आलेल्या 'त्या' इटलीतील पर्यटकांमधील कोरोनाचा संसर्ग धोकादायक; अभ्यासातील निष्कर्ष 


रत्नागिरीत कोविड-१९ लॅब उभारा; स्थानिक मच्छीमारांची मागणी


चिंता वाढली! कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३८० वर 


औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये कर्जाचा बोजा वाढला; शेतकऱ्याची आत्महत्या 


...तरीही 'त्या' एसटी चालकांना कुटुंबासह डांबले घरी..!