Tue, Feb 19, 2019 20:25होमपेज › Kolhapur › रंकाळा टॉवरनजीक आढळला सडलेला मृतदेह

रंकाळा टॉवरनजीक आढळला सडलेला मृतदेह

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:48AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

रंकाळा टॉवर येथील जाउळाच्या गणपती मंदिराच्या पिछाडीस शेडमध्ये अनोखळी पुरुषाचा मृतदेह सडलेल्या स्थितीत मिळून आला. अंदाजे 40 ते 45 वयोगटातील हा पुरुषाचा मृतदेह असून, तो गळफास घेतलेल्या स्थितीत आहे. परिसरात सुटलेल्या दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या की घातपात याविषयी पोलिस तपास करीत आहेत. 

रंकाळा टॉवर परिसरात पत्र्याचे शेड आहे. गेले दोन दिवस आसपास दुर्गंधी सुटली होती. शुक्रवारी नागरिकांना शंका आल्याने पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता, मृतदेह दिसला. लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी भेट दिली. वायरने गळफास घेतलेल्या स्थितीत हा मृतदेह असून, तो पूर्णपणे सडलेला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी सीपीआरमध्ये झाली. मृताच्या अंगावर टी शर्ट व जीन्स आहे. अंदाजे 40 ते 45 वयोगटातील व्यक्‍ती हा मृतदेह असून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. संबंधित व्यक्‍ती या शेडमध्ये कसा आला याबाबत साशंकता असून याबाबत आत्महत्या की घातपात या दोन्ही बाजूंनी पोलिस तपास करीत आहेत.